Question
भूमध्य समुद्राची क्षारता जास्त आहे.

Answer

(१) भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा भाग असला, तरी तो जवळजवळ पूर्णपणे आफ्रिका व युरोपदरम्यान जमिनीने वेढला आहे. (२) पश्चिमेकडील अगदी चिंचोळ्या अशा जिब्राल्टरच्या लामुद्रधुनीने तो अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. मात्र, यामुळे अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहांचा कोणताही प्रभाव भूमध्य समुद्रावर पडत नाही. (३) त्याशिवाय कोरड्या हवेमुळे बाष्पीभवनही जास्त होते. या कारणांमुळे भूमध्य समुद्राची क्षारता अटलांटिक महासागरापेक्षाही जास्त म्हणजे ३७० ते ३९० इतकी आहे. भूमध्य समुद्रातही पूर्वेकडील भागात पश्चिमेकडील भागापेक्षा क्षारता जास्त आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free