Question
चिपको आंदोलन.

Answer

(१) १९७३ च्या दरम्यान हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात चिपको आंदोलन सुरू झाले. या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती.
(२) त्या विरोधात चंडिप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले.
(३) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षांभोवती फेर धरण्याचे तंत्र स्वीकारले.
(४) वृक्षतोड होऊ नये; म्हणून झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे, असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने, या आंदोलनाला 'चिपको आंदोलन' असे म्हटले गेले.
(५) या आंदोलनामुळे वृक्षतोड तर थांबलीच; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्त्री-शक्तीचा प्रभाव समाजाला अनुभवता आला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free