Question
धवलक्रांती.

Answer

(१) स्वातंत्र्यानंतर नव्या उदद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उ‌द्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले.
(२) डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्हयातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली.
(३) सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्धप्रकल्प विकसित केला गेला.
(४) डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली. डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही 'धवलक्रांती' घडवून आणली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free