(१) १९७० मध्ये भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या एकत्रित चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठाची कल्पना पुढे आली.
(२) पी. पार्थसारथी यांच्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार २० सप्टेंबर १९८५ रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
(३) सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा पोहोचवणे, हा या विद्यापीठाचा हेतू होता.
(४) ज्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही; त्यांना पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सवलत देऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी या विद्यापीठाने दिली आहे.
(५) एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम, देशात व विदेशांतही प्रशिक्षण केंद्रे, आकाशवाणी व दूरदर्शन यांद्वारे दृक्-श्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण ही या विदयापीठाची वैशिष्ट्ये आहेत.