Question
मिश्र अर्थव्यवस्था.

Answer

(१) ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही उदयोग सरकारी मालकीचे असतात; अशा अर्थव्यवस्थेस 'मिश्र अर्थव्यवस्था' असे म्हणतात.
(२) मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो.
(३) या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो.
(४) भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचाच स्वीकार केला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free