(१) अनेक कारणांमुळे ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही, अशांना हे शिक्षण मिळवून पदवी प्राप्त करता यावी, यासाठी मुक्त विद्यापीठाची कल्पना पुढे आली.
(२) मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली आहे.
(३) औपचारिक पद्धतीप्रमाणे मुक्त विद्यापीठात वर्गात अध्यापन होत नाही. विद्यापीठातून प्रत्येक कोर्सचे छापील साहित्य अभ्यासासाठी मिळते. शिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांतून दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू असतात.
(४) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा मुक्त विद्यापीठांमार्फत अनेक अभ्यासक्रम राबवले जातात.