Question
जागतिकीकरणाचे फायदे.

Answer

शीतयुद्धानंतर झालेल्या जागतिकीकरणाचे जगाला पुढील फायदे झाले :
(१) जागतिक व्यापार व आर्थिक संबंधांत खुलेपणा आला.
(२) भांडवल, श्रम, बाजारपेठा व माहितीचे जागतिक पातळीवर आदानप्रदान सुरू झाले.
(३) विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्या.
(४) यामुळे व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले.
(५) सर्व राष्ट्रांना जगाच्या बाजारपेठा खुल्या होऊन मुबलकता वाढली.
(६) देशांच्या सीमारेषांची बंधने कमी होऊन देशादेशांत सामंजस्य व सद्भावना वाढीस लागली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free