Question
युनिसेफ (UNICEF).

Answer

(१) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकांच्या विकासासाठी निधी उभारण्याकरिता 'युनिसेफ' ही संयुक्त राष्ट्रांची एक संलग्न शाखा १९४६ साली स्थापन करण्यात आली.
(२) लहान मुलांना सकस आहार व आरोग्यसेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते.
(३) बाल-कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत युनिसेफ अविकसित देशांत कार्यशाळाही आयोजित करते.
(४) न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free