ज्वालामुखीचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :
(१) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते.
(२) महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात.
(३) ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, विषारी वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात.
(४) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होऊ शकते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.