Question
सागरजलक्षारतेच्या जागतिक वितरणाचा थोडक्यात आढावा घ्या.

Answer

(१) जगातील सागर आणि महासागरांच्या क्षारतेत विभिन्नता आढळून येते. सागरजलक्षारतेवर तापमान, बाष्पीभवनाचा वेग, गोड्या पाण्याच्या पुरवठ्याचे प्रमाण आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप या घटकांचा परिणाम होतो. या सर्व घटकांचा स्थानानुसार कमी-अधिक प्रभाव पडल्याने सागरजलक्षारतेत विभिन्नता आढळते.
(२) उष्ण कटिबंधीय मध्य अक्षवृत्तीय क्षेत्रात क्षारता जास्त, समशीतोष्ण कटिबंधीय क्षेत्रात क्षारता कमी आणि ध्रुवीय प्रदेशात ती अजून कमी होताना आढळते. ध्रुवाकडे कमी होत जाणारे तापमान आणि त्यानुसार कमी बाष्पीभवन याचा स्पष्ट प्रभाव येथे दिसून येतो. म्हणूनच मध्य अक्षवृत्तीय क्षेत्रात ३६० किंवा ३७% तर ध्रुवीय प्रदेशात ३२% क्षारता दिसून येते.
(३) विषुववृत्ताजवळ मात्र क्षारता मध्यम असते. बहुतांशी दिवस ढगाळ आकाश, रोज पडणारा आरोह पाऊस, अॅमेझॉन-कांगो नदघांमुळे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, मात्र त्याच वेळेस जास्त तापमान व जास्त बाष्पीभवन यांचा संतुलित प्रभाव झाल्याने विषुववृत्ताजवळ मध्यम क्षारता असते.
(४) भूवेष्टित समुद्रांची क्षारता ही खुल्या समुद्राच्या क्षारतेपेक्षा जास्त असते. म्हणूनच अटलांटिक महासागरात ३६% क्षारता आढळते, तर भूमध्यसमुद्राची क्षारता ३९% इतकी जास्त आहेत. मृत समुद्र या पूर्णतः खंडांतर्गत समुद्राची क्षारता ३३२% इतकी जास्त आहे. ढगाळ आकाश, चक्रीवादळांची जास्त संख्या आणि भारत-बांग्लादेशातील प्रमुख नद्यांमुळे होणारा गोड्या पाण्याचा प्रचंड पुरवठा यांमुळे बंगालच्या उपसागराची क्षारता ३२% इतकी कमी आहे. त्या तुलनेत अरबी समुद्राची क्षारता ३६% आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free