(१) आधुनिक तंत्र-विज्ञान युगात आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनिफिती, अनुबोधपट, आंतरजाल (इंटरनेट) अशी अनेक दृक्-श्राव्य साधने उपलब्ध झालेली आहेत.
(२) अशा साधनांच्या आधारे आपल्याला विपुल माहिती मिळू शकते.
(३) घटना घडत असतानाची दृश्ये कॅमेऱ्यात टिपता येतात.
(४) अनेक वृत्तपटांतून व अनुबोधपटांतून इतिहास उलगडत जातो. अशा आधुनिक साधनांना 'दृक्-श्राव्य साधने' असे म्हणतात.