(१) प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असते. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या क्षमतांचा शिक्षणामुळे विकास होतो.
(२) श्रवण, वाचन, लेखन, मनन-चिंतन, संभाषण अशा अनेक क्षमतांचा विकास करणे म्हणजे 'क्षमताधिष्ठित शिक्षण' होय.
(३) प्रत्येक वयोगटात कोणत्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे, हे निश्चित करण्यासाठी डॉ. आर. एच. दवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
(४) या समितीने राष्ट्रीय स्तरावर प्राथमिक शिक्षणासाठी किमान अध्ययनक्षमता निश्चित केली.