Question
कोठारी आयोग.

Answer

(१) मुदलियार आयोगाने सुचवलेल्या शिक्षणाच्या आकृतिबंधाची अंमलबजावणी अवघड झाल्याने १९६४ साली डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला.
(२) या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १०+२+३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला.
(३) संपूर्ण देशात एकच शिक्षण पद्धती, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी या त्रिभाषा सूत्राचा शिक्षणात समावेश अशा गोष्टी आयोगाने सुचवल्या.
(४) अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य, अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदींत वाढ करणे अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या.
(५) राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे इत्यादी शिक्षणाची उद्दिष्टे कोठारी आयोगाने निश्चित केली होती.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free