Question
विमुक्त जमाती.

Answer

(१) ब्रिटिशांनी भटक्या जमातींतील काही जमातींना 'गुन्हेगारी जमाती' ठरवले.
(२) १८७१ सालच्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत या जमातींपैकी प्रमुख गटांचा 'गुन्हेगारी जमाती' म्हणून उल्लेख करण्यात आला.
(३) त्यांचे व्यवसाय व हालचाली यांवर निर्बंध घालण्यात आले.
(४) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने हा अन्यायकारक कायदा रद्द करून या जमातींवरील अन्यायकारक बंधने उठवली. अशा जमातींचा समावेश 'विमुक्त जमाती' या गटात करण्यात आला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free