Question
जागतिकीकरण.

Answer

(१) 'जागतिकीकरण' म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच 'जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय.
(२) जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली, आर्थिक उदारीकरण घडून आले.
(३) उद्योग-व्यवसायांत अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.
(४) जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत बदल घडून आले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free