(१) राज्यातील पाठ्यपुस्तकांच्या दर्जात सुधारणा व्हावी व पाठ्यपुस्तके वाजवी दरात विद्यार्थ्यांना मिळावीत, अशी कोठारी आयोगाने सूचना केली होती.
(२) या सूचनेप्रमाणे २७ जानेवारी १९६७ रोजी 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ' अर्थात 'बालभारती' या स्वायत्त मंडळाची स्थापना करण्यात आली.
(३) बालभारती ही संस्था प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (इ. १ली ते १२वी) विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम करते.
(४) बालभारतीतर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती आणि तेलुगू या आठ भाषांमधून पहिली ते आठवी या इयत्तांसाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातात.
(५) विद्यार्थ्यांसाठीचे 'किशोर' हे मासिक बालभारती प्रकाशित करते.