(१) देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पीटीआय, यूएनआय, समाचार भारती व हिंदुस्थान समाचार या संस्था करतात.
(२) जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात.
(३) पीटीआय ही वृत्तसंस्था १९५३ पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपत्रांना देत आली आहे. १९९०च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली आहे.
(४) पीटीआय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहासलेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असतो.