(१) वस्तू, हत्यारे, नाणी, शिल्पे इत्यादींचे कलात्मकतेने मांडलेले कायमस्वरूपी प्रदर्शन म्हणजे 'वस्तुसंग्रहालय' होय.
(२) आपल्या राज्याची वैशिष्ट्ये दर्शवणारी प्रत्येक राज्याची संग्रहालये असतात. तसेच छंद असणारे संग्राहक आपली खाजगी संग्रहालये उभारतात.
(३) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे आहे.
(४) इतिहास लेखन व अभ्यास करणाऱ्यांना ही संग्रहालये अतिशय उपयुक्त असतात.