इतिहास - आर्थिक विकास — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - आर्थिक विकास2 Marks
Question
जागतिक व्यापार संघटना (WTO).
✓
Answer
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराचे नियमन करण्यासाठी यूनोशी संलग्न असणारी जागतिक व्यापार संघटना (WTO) अस्तित्वात आली. जगातील बहुतेक राष्ट्रे या संघटनेची सभासद आहेत. ही संघटना पुढील उद्देशांनी स्थापन झाली : (१) आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळे आणणारे निर्बंध व नियम संपुष्टात आणणे. (२) मुक्त व्यापारात भेदभाव करणारी धोरणे व कायदे रद्द करणे. (३) देशा-देशांमधील व्यापार खुला करणे. (४) जगभरातील व्यापाराचे बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून रीतसर नियमन करणे. भारताने १९९५ मध्ये या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.