(१) चंदीगड, नवी मुंबई, नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. अशा शहरांत निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजार क्षेत्र, शैक्षणिक व आरोग्यसंस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते.
(२) भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोई-सुविधांची आखणी नगर नियोजनात करण्यात येते.
(३) अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी 'स्मार्ट सिटी' योजना आकाराला आली आहे.
(४) अशा सुनियोजित शहरात प्रत्येक कुटुंबाच्या निवास, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल.